राहुल गांधींच्या ‘त्या’ शर्टवर मायावती नाराज? ; म्हणाल्या,”…मतांच्या हिताचे राजकारण”

Mayawati on Rahul Gandhi । बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निळ्या टी-शर्टवर भाष्य केले आहे. बसपा प्रमुखांनी राहुल यांनी निळा टी-शर्ट घालणे हे मतांच्या हिताचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. मायावतींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी “हे सर्व करण्याआधी सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनाही आपल्या अंत:करणातील संकुचित विचारसरणी, जातीवाद, द्वेष इत्यादींचा अंधार दूर करावा लागेल, तरच या वर्गाचे आणि देशाचे खरे हित शक्य आहे.”
हे केवळ मतांच्या हिताचे राजकारण Mayawati on Rahul Gandhi ।
“बाबासाहेब डॉ. आंबेडकरांबद्दल पूर्ण आदर न बाळगणे आणि त्यांच्या अनुयायांवर अन्याय व अत्याचार करण्यात तसेच त्यांचे घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार हिरावून घेण्यात हे सर्व पक्ष समान आहेत,”असे माजी खासदार यांनी लिहिले आहे. यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला वाद हे केवळ मतांच्या हिताचे राजकारण आहे.
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर बसपा प्रमुखांची प्रतिक्रिया Mayawati on Rahul Gandhi ।
गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत बसपा प्रमुख यांनी,”दलित आणि इतर उपेक्षित वर्गाचे मसिहा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपचे अमित शहा यांनी संसदेत जे शब्द वापरले आहेत त्यामुळे या वर्गाच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या वक्तव्याने आपल्या मनाला खोलपर्यंत वेदना झाल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी ते शब्द परत घेऊन पश्चात्ताप केला पाहिजे ” असेही त्यांनी म्हटले.
पुढे त्यांनी ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कोट्यवधी दलित-मागास, शोषित-पीडित अनुयायांच्या हितासाठी आणि कल्याणाबाबत काँग्रेस, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची वागणूक, चारित्र्य आणि चेहरा नेहमीच संकुचित आणि जातीयवादी राहिला आहे, परंतु त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती सतत बिघडत चालली आहे, हे नाकारणे अशक्य आहे.
हेही वाचा
“माझ्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली” ; भुजबळांच्या कट्टर विरोधकाचा खळबळजनक दावा





