Preity Zinta: “तुझ्या हनिमूनला मी तिसरी व्यक्ती होते…” प्रीती झिंटाची बॉबी देओलसाठी खास पोस्ट चर्चेत
Preity Zinta व्हिडीओ शेअर करताना प्रीतीने बॉबी देओलला टॅग करून एक खास आठवण सांगितली. तिने लिहिलं की, “हे बघ बॉबी, मला काय सापडलं. ऑस्ट्रेलियातील माझं पहिलं आऊटडोअर शूट तू खूप मजेशीर बनवलंस. त्याबद्दल मी तुझी कायम आभारी राहीन.”

Preity Zinta: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. जुन्या आठवणी, मित्रमैत्रिणींबरोबरचे फोटो आणि मजेशीर किस्से शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आता प्रीतीने अभिनेता बॉबी देओलबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला असून तिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रीती झिंटाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सोल्जर’ चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील लोकप्रिय ‘महफिल में बार बार’ हे गाणं ऐकू येत आहे. या गाण्याला कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी आवाज दिला होता. ‘सोल्जर’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये प्रीती झिंटा (Preity Zinta) व बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. (Preity Zinta)
व्हिडीओ शेअर करताना प्रीतीने बॉबी देओलला टॅग करून एक खास आठवण सांगितली. तिने लिहिलं की, “हे बघ बॉबी, मला काय सापडलं. ऑस्ट्रेलियातील माझं पहिलं आऊटडोअर शूट तू खूप मजेशीर बनवलंस. त्याबद्दल मी तुझी कायम आभारी राहीन.”
यासोबतच प्रीतीने एक मजेशीर खुलासाही केला. ती म्हणाली, “तुझ्या हनिमूनला मी तिथे होते. त्यामुळे तुमच्यातील तिसरी व्यक्ती होऊन मला खूप आनंद झाला.” प्रीतीच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Preity Zinta)
View this post on Instagram
सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी ‘सोल्जर’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी या चित्रपटातील गाणी आणि अॅक्शनची स्तुती केली, तर काहींनी “असे चित्रपट आता बनत नाहीत” अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रीती आणि बॉबीच्या मैत्रीचं कौतुक केलं.
बॉबी देओलने १९९६ मध्ये तान्या आहुजासोबत लग्न केलं होतं. तान्या एका व्यावसायिक कुटुंबातील असून त्यांचा फर्निचर व्यवसाय आहे. लग्नानंतर काही काळातच ‘सोल्जर’ चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. त्यामुळे त्या काळातील अनेक आठवणी आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. (Preity Zinta)
Preity Zinta: “तुझ्या हनिमूनला मी तिसरी व्यक्ती होते…” प्रीती झिंटाची बॉबी देओलसाठी खास पोस्ट चर्चेत
‘सोल्जर’ हा चित्रपट त्या काळात मोठा हिट ठरला होता. सस्पेन्स, दमदार अॅक्शन आणि गाण्यांमुळे या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. चित्रपटात राखी गुलजार, सुरेश ओबेरॉय आणि दिलीप ताहिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. (Preity Zinta)
दरम्यान, बॉबी देओल सध्या नकारात्मक भूमिकांमुळे पुन्हा चर्चेत आहे. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत असून आगामी चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर प्रीती झिंटाची ही पोस्ट जुन्या आठवणींना उजाळा देणारी ठरली आहे.





