Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा पोहचली सुवर्ण मंदिरात; साधेपणाचे चाहत्यांकडून कौतुक
Preity Zinta : प्रीती झिंटाने कोणत्याही व्हीआयपीप्रमाणे नाही, तर एका सामान्य भाविकाप्रमाणे गुरुद्वारात हजेरी लावली.

Preity Zinta : आयपीएल आता अंतिम टप्प्याकडे वळत असताना पंजाब किंग्सची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आध्यात्मिक शांतीचा मार्ग निवडला आहे. शनिवारी पहाटे प्रीतीने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आणि आपल्या संघाच्या विजयासाठी साकडं घातलं.
यावेळी तिने कोणत्याही व्हीआयपीप्रमाणे (VIP) नाही, तर एका सामान्य भाविकाप्रमाणे गुरुद्वारात हजेरी लावली. पिवळ्या रंगाच्या पारंपरिक सलवार सूटमध्ये सुवर्ण मंदिरात प्रीती पोहचली होती. तिने केवळ दर्शनच घेतले नाही, तर एक सामान्य भक्त म्हणून लंगर हॉलमध्ये सेवाही केली.
दर्शनानंतर प्रीतीने स्वतःच्या हाताने भाविकांना भोजन वाढले. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.
माध्यामांशी बोलताना प्रीतीने स्पष्ट केले की, “जेव्हा बाबांचा बोलावणं येतं, तेव्हाच तुम्ही इथे पोहोचू शकता.” संघाच्या कामगिरीवर बोलताना तिने, स्पर्धेच्या या वळणावर मेहनतीसोबतच देवाच्या आशीर्वादाचीही नितांत गरज असल्याचेही सांगितले.
श्रेयसच्या नेतृत्वाखाली संघाची दमदार कामगिरी
या दौऱ्यादरम्यान प्रीतीने संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरही भाष्य केले. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने श्रेयसला असा कर्णधार म्हटले, ज्याच्यामध्ये संपूर्ण संघाला एकत्र घेऊन चालण्याची क्षमता आहे.
#WATCH | Punjab | Actor and the owner of IPL team Punjab Kings, Preity Zinta, offered prayers and performed sewa at Sri Darbar Sahib, the Golden Temple in Amritsar
She says, “We wish we win all the matches, but it is upon the divine favour and the players’ efforts…” (09.05) pic.twitter.com/5Q8eRB1UQJ
— ANI (@ANI) May 9, 2026
प्रीती झिंटाच्या बॉलिवूडमधील कामाबद्दल बोलायचं झालं तरम् लवकरच ती ‘लाहोर १९४७’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सनी देओलसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा: Narapur Case : “असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करा”; नसरापूर प्रकरणातील चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया





