Maharashtra Lok Sabha Result 2024 : मावळ मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य कायम

Maval Constituency | मावळ मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी मत मोजणीच्या पाहिल्या फेरीपासूनच आपले मताधिक्क्य कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. सहाव्या फेरीअखेर बारणे हे महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यापेक्षा 39 हजार 694 मातांनी आघाडीवर आहेत.
मावळ मतदार संघाची सध्या सातवी फेरी अधिकृतरित्या सुरू आहे. पाहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 5 हजार 731 मातांनी आघाडी घेतली. दुसर्या फेरीत त्यांना 61 हजार 421 तर वाघेरे पाटील यांना 53 हजार 124 मते मिळाली.
विशेष म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघातूनच बारणे यांना लीड मिळाली आहे. हे लीड टिकवण्यात त्यांना यश आले आले.
पाचव्या फेरी अखेर बारणे याना 1 लाख 56 हजार 953 तर वाघेरे याना 1 लाख 27 हजार 417 मते मिळाली. 29 हजार 536 मतांची आघाडी टिकवण्यात त्यांना यश आले.
सहाव्या फेरी अखेर बारणे यांनी 1 लाख 89 हजार 915 मते घेऊन 39 हजार 694 मतांची आघाडी कायम ठेवली. तर, वाघेरे पाटील हे 1 लाख 50 हजार 221 मते घेऊन कायम पिछाडीवर राहिले आहेत.





