नवी दिल्ली – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने पेटती मशाल ( Mashal Symbol ) हे निवडणूक चिन्ह दिले आहे. या निर्णयाला समता पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते पण त्यांची ही आव्हान याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. समता पार्टीला पुर्वी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते व त्या चिन्हावर त्यांनी निवडणूकही लढवली होती.
#AnilDeshmukh | अनिल देशमुख प्रकरणात तपास यंत्रणांचा वेळकाढूपणा, न्यायालयाने फटकारले
त्यामुळे हे चिन्ह शिवसेनाला दिले जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती. पण समता पार्टीची मान्यता 2004 साली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ते या निवडणूक चिन्हावर हक्क सांगू शकत नाहीत असे नमूद करीत हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली.
न्यायालय या याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नाही असे नमूद करीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.