DelhI High Court: उच्च न्यायालयाकडून टेलिग्रामला मोठा धक्का ; ‘ती’ याचिका फेटाळली, २२ जूनपर्यंत बंदी कायम राहणार
DelhI High Court: टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीच्या विरोधात ॲपची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

DelhI High Court: टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीच्या विरोधात ॲपची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. NEET UG पुनर्परीक्षेपूर्वी 22 जूनपर्यंत टेलिग्राम ॲप प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या दिल्ली उच्च न्यायालयात टेलिग्रामने आव्हान दिले होते, जे आज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, सरकारचा निर्णय विसंगत म्हणता येणार नाही. गेल्या महिन्यात NEET UG परीक्षा 3 मे रोजी झाली होती, मात्र नंतर पेपर फुटल्याची बाब समोर आली. (DelhI High Court)
यावर देशभरात गदारोळ झाला, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. यानंतर सरकारने ३ मेची परीक्षा रद्द केली. (DelhI High Court)

DelhI High Court: उच्च न्यायालयाकडून टेलिग्रामला मोठा धक्का ; ‘ती’ याचिका फेटाळली, २२ जूनपर्यंत बंदी कायम राहणार
आता 22 जून रोजी पुन्हा परीक्षा होणार आहे, अशा परिस्थितीत पुन्हा अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. (DelhI High Court)
गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही ॲपबाबतचे सर्व तांत्रिक मुद्दे न्यायालयात मांडले त्यामुळे परीक्षेपूर्वी चुकीच्या घटकांकडून ॲपचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
मात्र, न्यायालयाने सरकारच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले आणि काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे 15 कोटी वापरकर्त्यांना ॲप वापरण्यापासून कसे रोखले जाऊ शकते, अशी विचारणा केली. (DelhI High Court)





