Pune District :मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले
Updated On:

मंचर – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उठाव कमी असल्यामुळे कांद्याचे भाव घसरले.मंगळवार, दि.१५ रोजी चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोला १८० रुपये, असा बाजारभाव मिळाला. एकूण ५४७९ पिशवी कांद्याची आवक झाली,अशी माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली.
मंचर बाजार समितीत कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे:सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा रुपये १७०ते १८० रुपये,सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १५५ते १६५ रुपये,
सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १३५ ते १५० रुपये, गोल्टी कांद्यास ९५ ते १२५रुपये, बदला कांदा व चिंगळी कांद्यास ३० ते ८० रुपये असा बाजारभाव मिळाला,अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.





