Ajit Pawar : सैयारामुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळेनात; अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : बॅाक्स अॅाफिसवर सैयारा हा हिंदी चित्रपट धूमाकूळ घालत आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटीची कमाई करणार आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रातील मराठी चित्रपटांचे शो उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी हिंदी वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याविषयी नुकतीच अमेल खोपकर यांनी आपली भूमिका मांडत काचा फुटतील असा थेट इशारा मल्टिप्लेक्स मालकांना दिला होता. या वादात आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. त्यांच्याकडे काय चालणार आणि काय चालवायचं हा मल्टिप्लेक्स वाल्यांचा निर्णय आहे अमेय खोपकरांनी लोकांना धमकी देऊ नये, असा इशारा सदावर्तेंनी दिला आहे. अशातच आता यावर उमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
मी तुम्हाला सांगतो, जर चित्रपट उत्तम असेल, तर सगळे चित्रपट लावतात. मला मागचा काळ आठवतो. दादा कोंडकेंचे सात की आठ चित्रपट सिल्व्हर जुबिली ठरले. आज लोकांना सांगावं लागत नाही. उत्तम चित्रपट आला की लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले?





