Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंना पाकिस्तानी खाज आली; गुणरत्न सदावर्ते यांची जळजळीत टीका

Raj Thackeray on Gunaratna Sadavarte | भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या पीडितांबरोबर सर्वसामान्यांनीही याचे कौतुक केले आहे. या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, असं म्हटले आहे.
तसेच पाकिस्तान हा आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबाद करताय तुम्ही? असा सवाल करत राज ठाकरे यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.
त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज ठाकरेंच्या बोलण्यात देशप्रेम दिसतंय का? देश प्रेम पहिले महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी पाकिस्तानचा ब्रोडकास्टिंग मिनिस्टर मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अंतराष्ट्रीय चॅनेलवर येऊन जी भाषा बोलतो, तिच भाषा राज ठाकरे बोलत आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
तसेच राज ठाकरेंची मती मारली गेली का? राज ठाकरे विदेशात फिरून आल्यानंतर त्यांना पाकिस्तानी खाज आली अशी जळजळीत टीका गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते. Operation Sindoor |
काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, “पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध असू शकत नाही. युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रील आणि सायरन वाजवायचे. मुळात हे का घडलं? याचा विचार करणे गरजेचे आहे. इतके पर्यटक असताना तिथे सुरक्षा का नव्हती हे महत्त्वाचे आहे,” असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. Raj Thackeray on Operation Sindoor |
‘मॉक ड्रील, एअर स्ट्राईक करणे हे या गोष्टीवर उत्तर नाही’
“पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला अजून काय बरबाद करणार? हल्ला करणारे अतिरेकी तुम्हाला सापडलेले नाहीत. एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत. मॉक ड्रील, एअर स्ट्राईक करणे हे काही या गोष्टीवर उत्तर नाही. अतिरेक्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणे आणि देशभर मॉक ड्रील करण्यापेक्षा कोंबिग ऑपरेशन केले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले. Gunaratna Sadavarte |





