सलमान खानसोबत झळकली मराठमोळी अभिनेत्री; व्यक्त केला आनंद

Salman Khan | बॉलीवूडचा दंबग अर्थात सलमान खानसोबत एका मराठमोळ्या अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केली आहे. बॉलीवूडच्या दिग्गज कलाकार मंडळींसोबत काम करण्याच्या अनेकांची इच्छा असते. यातच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनुष्का सरकटे हिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनुष्काला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
अनुष्का आणि सलमानने 10x classic atta या ब्रँडच्या जाहिरातीसाठी एकत्र काम केले आहे. अनुष्काने या जाहिरातीचा व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच तिने सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.
“ज्याचे चित्रपट बघून मी लहानाची मोठी झालीय, जो आपल्या युगातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे अशा सलमानखान सोबत काम करणं स्वप्नवत तर नक्की होतंच पण त्याच बरोबर खुप प्रेरणादायी ही होते. मी खुप आनंदी आणि कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली,” असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Salman Khan |
View this post on Instagram
दरम्यान, अनुष्काने तिचा अभिनयाचा प्रवास शिक्षण घेत असतानाच सुरू केला. ‘श्री लक्ष्मीनारायण’ ही तिची पहिलीच मालिका. यानंतर अनुष्काने कधी मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर अनुष्काने ‘कारभारी लयभारी’ , ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतही अभिनय केला आहे. Salman Khan |
मालिकांव्यतिरिक्त अनुष्काने जाहिरातीमधून तिचे नाव कमावले. पीएनजी ज्वेलर्स, पार्ले क्रॅकजॅक ,कीर्ती गोल्ड ऑइल, बिग बास्केट या नामवंत ब्रँडसाठी अनुष्का मुख्य चेहरा बनली. यानंतर आता अनुष्काने बॅालिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत जाहिरातीत काम केले आहे. Salman Khan |
हेही वाचा:





