Amruta Khanvilkar : ‘प्रेमात पडणं हा पहिला गुन्हा…’; अमृता खानविलकर नेमकं काय म्हणाली?
Amruta Khanvilkar : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
Amruta Khanvilkar : ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाजलेल्या लावणीमुळे अभिनेत्री अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयासोबतच नृत्य आणि हटके अंदाजामुळे अमृताने मराठी मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीदरम्यान अमृताला तिच्या आयुष्यातील तीन गुन्हे कोणते, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेत्रीने चक्क पाटीवर तीन गोष्टी लिहून आपल्या मजेशीर अंदाजात उत्तर दिले. प्रेमात पडणे, गोड पदार्थ खाणे आणि आळस करणे हे आपले तीन गुन्हे असल्याचे तिने सांगितले.
अमृता म्हणाली, “मला असं वाटतं की, हे तीन गुन्हे मी केलेले आहेत. प्रेमात पडणं हा माझा पहिला गुन्हा आहे. गोड खाणे हा माझा दुसरा गुन्हा आहे. मी खूप गोड पदार्थ खाते. आणि तिसरा म्हणजे आळस.”
‘आता प्रेमात पडून राहणं नको!’
आपल्या पहिल्या गुन्ह्याबद्दल बोलताना अमृताने प्रेमाविषयी मजेशीर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “आता हा गुन्हा नको. प्रेमात पडल्यानंतर ते जे पडून राहणं असतं, ते मला आता नको.”
तसेच गोड खाण्याच्या सवयीबद्दल बोलताना ही सवय अजूनही सुटलेली नसल्याचे तिने सांगितले. तर आळस हा देखील आपल्या आयुष्यातील एक गुन्हा असल्याचे अमृताने गंमतीने कबूल केले.
अमृता खानविलकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ आणि रील्सच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे हटके लूक्स, नृत्य आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा चर्चेत असते.
दरम्यान, या मुलाखतीतील तिच्या मजेशीर उत्तरांची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तसेच अमृता आगामी काळात कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Parenting Tips: मुलं मनातलं सांगत नाहीत? पालकांच्या ‘या’ ७ चुका ठरू शकतात नात्यातील दुराव्याचं कारण!





