उमेश कामतच्या आयुष्यात परत आलं पहिलं प्रेम, खास व्हीडिओ केला शेअर

Umesh Kamat Viral Post : अनेक मराठी कलाकारांनी नवीन वर्षाची सुरुवात जल्लोषात केली आहे. काहीजण नवीन घरात प्रवेश करत आहेत, तर काहींनी नवीन कार खरेदी केली. अभिनेता उमेश कामतसाठी देखील नवीन वर्षाची सुरुवात खास झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उमेश कामतच्या आयुष्यात त्याच पहिलं प्रेम परत आलं आहे. अर्थात त्याचं पहिलं प्रेम म्हणजे त्याची बाईक.
उमेश कामतने नववर्षाच्या सुरुवातीला नवीन बाईक खरेदी केला आहे. या नवीन बाईकचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. उमेशने Triumph Scrambler 400 ही बाईक खरेदी केली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये उमेशसोबत त्याची पत्नी प्रिया बापटही दिसत आहे. बाईक खरेदी केल्यानंतर या जोडप्याने पुजा देखील केली. बाईकचा व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत उमेशने लिहिले की, पहिला मिनी ब्लॉग हाच असावा. माझे पहिले प्रेम आयुष्यात परत आले. सोबतच, आजची व्हिडीओग्राफर बायको होती, असे म्हणत त्याने प्रिया बापटलाही टॅग केले.
उमेशने सोशल मीडियावर शेअर केलेला बाईकचा हा मिनी व्लॉग व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी नवीन बाईकसाठी प्रिया आण उमेशचे कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन देखील केले.





