Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : ‘धनंजय मुंडेंच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होतोय…’; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde – बीडच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे संदेश प्राप्त झालेत. मात्र, धंनजय मुंडे यांनी सांगितले की तसे काही नाही. कोणीतरी अफवा पसरवत आहे. याबाबत मुंडेंचे कौतुक आहे. पण त्यांच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना आवरावे, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी मुंडे यांना इशारा देताना म्हटले आहे.
जरांगे पुढे म्हणाले, अजित पवार हे सत्तेत आहेत. त्यांचे लोक छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे मराठ्यांना लक्ष्य करत आहेत, आता तुम्ही भोगा असा इशारा जरांगेंनी अजित पवार यांना दिला आहे. आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना बघायला आलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तर आम्ही कोणाच्या फायद्यासाठी कामच करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे. आम्ही आमची शक्ती दाखवतो, असे जरांगेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.
भुजबळांना सरकारने बळ दिले
ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभे करण्याचे काम छगन भुजबळ यांनी केले आहे. मी माझा समाज एका बाजुला आहे. सगळे ओबीसीचे नेते एका बाजुला आहे. नेते राजकीय स्वार्थासाठी काम करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तर राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही.
छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारने बळ दिले आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रीपद दिले आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभे करण्याचे काम भुजबळांनी केले असेही त्यांनी म्हटले आहे.





