Maratha Reservation : “लय अवघड असतं भाऊ, एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही…’; मनोज जरांगेंचा थेट अमित शहांना इशारा

Amit Shah । Manoj Jarang | Maratha Reservation – मनोज जरांगेंनी आंदोलनाच्या 9 व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता. माझ्या माय माऊल्यांनी त्यासाठी मला वारंवार विनंती केली.
त्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याचे जरांगनी सांगितले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी – ज्यांनी मराठा समाजाला त्रास दिला, त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. मात्र, त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी थेट भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन करतान जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटवू शकत नाही. पण तुम्ही आरक्षण नाही दिली तर मात्र तुम्हाला चिलमीत चहा प्यायची वेळ येईल. लय अवघड असतं भाऊ’. असा इशारा जरांगे यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांनाच दिला आहे.
रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच थेट अमित शहा यांना टार्गेट केलं आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, “अमित शहा यांनी बरेच राजकीय एन्काऊंटर केले आता तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल असे मनोज जरांगे म्हणाले.
कळस बसवण्याआधी मूर्ती बसवणारे हे आंदोलन हाताळणार का असा सवालही त्यांनी. नरेंद्र मोदी आणि अमित शहा सरदार पटेल यांच्या स्थळाचे तुम्ही असे का केलत? फक्त तुमच्याकडेच दादा आणि गुंड आहेत असे वाटते का? सगळ्यांकडे आहेत दादा आणि गुंड यांच्या जीवावर तुम्ही दादागिरी करत असाल तर आमच्याकडे मराठा गुंड आहेत. असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
अमित शहांना कत्तली करायच्या आहेत का?
अमित शहा यांना कत्तली करायचं आहेत का? दादागिरीने यांना खुर्ची आणायचे आहे. जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही. तुम्ही तुमच्यात काड्या लावल्या. भाजपमध्ये फोडाफोडी केली. आरेला कार्य केल्यास महाराष्ट्रापासून तर तिथपर्यंत कार्यक्रम करेल . मराठ्यांनी खिंडीत पकडले तर बेकार हाल होतील असे मनोज जरांगे म्हणाले.
मी तुम्हाला क्लिअर सांगतो…
जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटवू शकत नाही. पण तुम्ही आरक्षण नाही दिली तर मात्र तुम्हाला चिलमीत चहा प्यायची वेळ येईल. लय अवघड असतं भाऊ. ती वेळ येईल मग.
ती वेळ येऊ द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत मला माहीत आहे. तुम्हाला वाटत असेल हे खेड्यातलं आहे. पण मी सर्व आंदोलनांचा अभ्यास केला आहे.
तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून, आरक्षण न देता आंदोलन हाताळू असं तुम्हाला वाटत असेल तर अमित शाह साहेब तुमची आयुष्यातली ही घोडचूक असणार आहे. तुम्ही जी काही यंत्रणा आणली तरी तुम्ही महाराष्ट्रात संविधानाच्या पदावर बसणार नाही असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.





