Maratha reservation । मराठा आरक्षणाला मंजुरी मिळताच वडेट्टीवारांनी ‘सगे सोयरे’ वरून केला महत्त्वपूर्ण मुद्द्या उपस्थित

तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मुद्या उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘आज मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले खरे पण काही मुद्यांबाबत अजुनही संभ्रम असल्याचे दिसते त्या पैकीच एक मुद्दा म्हणजे सग्यासोयऱ्यांचा आहे. मराठा नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे यांची मागणी आहे तर संपूर्ण मराठा समाजाला हक्काचे वेगळे आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे काही मुद्द्यांबाबत स्पष्टता यावी अशी मागणी करणारे पत्र विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पाठविले आहे.
पत्रात विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार हे अजुन स्पष्ट नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी पत्रात म्हंटले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार? तसेच सगे सोयरे अधिसूचना बाबत स्पष्टता द्यावी अशी मागणी देखील काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.





