Maratha Reservation : ‘मराठा आणि ओबीसीत भांडणे लावणे हा भाजपाचा डाव’; नाना पटाले यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा लाखो समर्थकांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत सरकारचे निवेदन वाचून दाखवलं आहे.
यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज रात्रीपर्यंत सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश देण्याची मागणी केली आहे. आज रात्रीपर्यंत अध्यादेश दिला नाही तर उद्या मुंबईत येऊ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मात्र, भाषण संपताच मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं. त्यानंतर आता महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मराठ्यांना आणि धनगर समाजाची चेष्टा चालविली आहे. साल 2014 मध्ये सत्तेत येताना भाजपा सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिले होते. केंद्र सरकार 50 टक्क्यांची मर्यादा हटवून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकते असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जातीनिहाय जनगणना करुन ज्या जातींच्या संख्येनुसार आरक्षण द्यायला हवे. परंतू मराठा आणि ओबीसीत भांडणे लावून महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करण्याचा भाजपाचा डाव असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तसेच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस पुरविण्यात यावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटाले यांनी केली आहे.





