जून महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला उभारी; पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स 14 महिन्यांच्या उच्चांंकावर

नवी दिल्ली : पावसाळा असूनही जून महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढून 14 महिन्याच्या उच्चांकावर गेली आहे. जून महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा परर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय 58.4 इतका मोजला गेला. मे महिन्यामध्ये हा निर्देशांक 57.6 इतका मोजला गेला होता. देशातून आणि परदेशातून या क्षेत्राला मिळालेल्या ऑर्डरमध्ये वाढ होत असून या क्षेत्रामध्ये बरीच रोजगार निर्मिती झाली असल्याचे हा निर्देशांक तयार करणार्या एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ञ प्रांजूल भंडारी यांनी सांगितले.
या क्षेत्रातने मंदीतून बाहेर पडण्याचे ठरविले असून बरीच मोठी जाहिरात मोहीम हाती घेतली आहे.त्यामुळे देशातून आणि परदेशातून ऑर्डर वाढल्या आहेत. किंबहुना जून महिन्यांमध्ये या क्षेत्रातून झालेली निर्यातही वाढली आहे. वीस वर्षात प्रथमच जून महिन्यात वाढलेल्या परदेशी ऑर्डर जास्त असल्याचे नमूद करण्यात आले. फेब्रुवारीनंतर प्रथमच कच्च्या मालाच्या किमती बर्याच कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर या अगोदर वाढलेल्या किमतीनुसार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने आपल्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे या क्षेत्राचे ताळेबंद नफादायक ठरण्याची शक्यता आहे.
व्यापार युद्ध, वाढलेली स्पर्धा आणि परदेशातील महागाई इत्यादी अडथळे असूनही या क्षेत्राने जून महिन्यात उत्तम कामगिरी केली असून आगामी काळात परिस्थितीत अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या व्याजदर कपातीचा या क्षेत्राला लाभ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. देशातील 400 कंपन्यांच्या पर्चेसिंग मॅनेजरकडून मिळविलेल्या माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात येतो.





