Kanpur fire । उत्तरप्रदेशच्या कानपुरमधील देहात रानिया याठिकाणी फोम मॅट्रेस बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली असल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत आतापर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तीन जणांचा जागीच मृत्यू Kanpur fire । रात्रीच्या शिफ्टमध्ये सुमारे 15 कर्मचारी कारखान्यात उपस्थित होते. प्राथमिक तपासानुसार मशीनमधून ठिणगी आल्यानंतर अचानक आग लागली. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कानपूरमध्ये एकाचा तर लखनऊमध्ये उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. कारखान्याच्या तीन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल Kanpur fire । कानपूर देहाटचे एसपी बीबीजीटीएस मूर्ती यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या तीन संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीडितांकडून कोणतीही तक्रार न आल्याने अग्निशमन विभागाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.