Industrial: बर्याच प्रयत्नानंतर अखेर मॅन्यफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढून 5.2% वर गेले आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता फेब्रुवारी महिन्यात वाढून 6 टक्क्यावर गेल्यामुळे एकूण औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत झाली. आठवडाभरापूर्वी पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता कमी होऊनही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने हातभार लावल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 2.7 टक्क्यांनी वाढले होते. तर जानेवारी महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 5.1 टक्क्यांनी वाढले होते. म्हणजे मासिक व वार्षिक पातळीवर औद्योगिक उत्पादन वाढण्स मदत झाली आहे. असे असले तरी आता मार्च महिन्यात युद्धामुळे देशातील आणि परदेशातील खरेदीवर परिणाम झाल्यामुळे याचा नकारात्मक प्रभाव औद्योगिक उत्पादनावर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन केवळ 2.8 टक्क्यांनी वाढले होते. त्या तुलनेत यावर्षी आकडेवारी बरीच सकारात्मक आहे. हेही वाचा – केंद्राची वित्तीय तूट 12.52 लाख कोटींवर; उद्दिष्टाच्या 80 टक्क्यांहून अधिक फेब्रुवारी महिन्यात खाण क्षेत्राची उत्पादकता गेल्या वर्षाच्या 1.6% च्या तुलनेत 3.1 टक्क्यांनी वाढली आहे. वीज निर्मिती गेल्या वर्षाच्या 3.6% च्या तुलनेत कमी होऊन 2.3 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी इतकेच म्हणजे 4.1 टक्क्यांनी वाढले आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील 23 पैकी 14 क्षेत्रात वाढ नोंदली गेली आहे. वाहन उत्पादन 14.9 टक्क्यांनी तर भांडवली वस्तू उत्पादन 10.2 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र मार्च महिन्यामध्ये आखातात युद्ध सुरू झाल्यामुळे मार्च महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीच्या तुलनेत तीन ते चार टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे इक्रा या संस्थेच्या संशोधन प्रमुख आदिती नायर यांना वाटते.