Industrial production: डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन 7.8% वर; दोन वर्षांची उच्चांकी झेप
Industrial production : मॅन्युफॅक्चरिंग, वीज आणि खाण क्षेत्रातील उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिसेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढून 7.8% या दोन वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे.

Industrial production: मॅन्युफॅक्चरिंग, वीज आणि खाण क्षेत्रातील उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिसेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादन वाढून 7.8% या दोन वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास या आकडेवारीचा उपयोग होऊ शकेल असे समजले जात आहे.
डिसेंबर 2024 मध्ये औद्योगिक उत्पादन 3.7 टक्क्यांनी वाढले होते. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 7.2 टक्क्यांनी वाढले होते. म्हणजे तिमाही आणि वार्षिक पातळीवरही औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता तब्बल 8.1 टक्क्यांनीे वाढली आहे. त्यामुळे एकूणच औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मनुफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता किंवा 3.7 टक्क्यांनी वाढली होती. पावसाळा समाप्त झाल्यामुळे आता खाण क्षेत्राची उत्पादकता वेग घेत असून डिसेंबर महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता 6.8 टक्क्यांनी वाढली आहे. जीकी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये केवळ 2.7% इतकी होती.
डिसेंबर महिन्यात वीज निर्मिती 6.3 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वीज निर्मिती केवळ 6.2 टक्क्यांनी वाढली होती. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन मात्र कमी होऊन 3.9% इतके झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 4.1% होते.
डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढल्यामुळे जानेवारी ते मार्च या कालावधीत औद्योगिक उत्पादन वाढेल आणि एकूण वार्षिक औद्योगिक उत्पादन सकारात्मक पातळीवर जाईल असे समजले जात आहे. निर्यातीचा आधार कमी असूनही औद्योगिक उत्पादन वाढण्यात यश मिळाले असल्याबद्दल उद्योग क्षेत्राने समाधान व्यक्त केले आहे.





