नाशिकमध्ये होणार मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप; उद्या शाळांना सुट्टी जाहीर !

नाशिक – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे उद्या नाशिक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा उद्या नाशिक येथे जाहीर सभेनंतर समारोप होणार आहे.
मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली विविध जिल्ह्यातून येऊन उद्या नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. नाशिकच्या तपोवन येथून निमानी, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय,शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्तीय भागातील सीबीएस चौक या ठिकाणी जरांगे यांच्या सभेने रॅलीचा समारोप होणार आहे.
नाशिकच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएस चौकात मंडप उभारण्यात आले आहे. मनोज जरांगे उद्या सभेतून नेमकं काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





