manoj jarange patil : “आमच्या मागे मराठा समाज आहे…’; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर

manoj jarange patil : राज्यात मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) त्यांचा दौरा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली होती. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की,
“मनोज जरांगे (manoj jarange patil) यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण कधीही मिळणार नाही. हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल..’ असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
मात्र, आता त्यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना सणसणीत उत्तर दिलं आहे. “आमच्या मागे कोण आहे हे लवकरच शोधून सांगा. तुमच्या जास्त ओळखी आहेत. आमच्या कमी आहेत. लवकर शोधून आणा. आम्हाला फक्त त्यांचं नाव सांगा. आमच्या मागे कोण आहे? आम्हीच त्याला नीट करतो. आमच्या मागे एकच आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. ते आम्हाला माहीत आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आले होते. ठाण्यात त्यांची आज प्रचंड मोठी रॅली पार पडली. रॅली नंतर सभा झाली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर जरांगे पाटील यांनी भाष्य केलं.





