ACB Raid : बीड जिल्ह्यात लाच घेताना पंचायत अधिकाऱ्याला अटक
ACB Raid : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बन्सारोला येथे घरकुल योजनेच्या अनुदानाचा हप्ता मंजूर करण्यासाठी ३,००० रुपयांची लाच घेताना ग्राम रोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.

ACB Raid : बीड जिल्ह्यात घरकुल योजनेचा निधी मंजूर करण्यासाठी ३,००० रुपयांची लाच घेताना एका पंचायत अधिकाऱ्याला पकडण्यात आले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दिली. (ACB Raid)
कैज तालुक्यातील बन्सारोला येथे शुक्रवारी ग्राम रोजगार सेवक गोविंद सोपान गोरे (५०) याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या आईला प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि मोदी आवास योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली होती. (ACB Raid)
घरकुल योजनेच्या निधीचा तिसरा आणि चौथा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बदल्यात गोरे याने तक्रारदाराकडे ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या अधिकाऱ्याविरुद्ध कैज येथील युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एसीबीने सांगितले. (ACB Raid)
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीडचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (ACB Raid)
Vaibhav Naik : ठाकरे गटाचा बडा नेता ACBच्या रडारवर; काय आहे प्रकरण जाणून घ्या…





