कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज पुणे दौऱ्यावर; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या पुण्यातील निवासस्थाना बाहेर कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. आज पुण्यात कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे कोकटे यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला आहे. असे असतानाच छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते.
लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले होते. विधीमंडळात रमी खेळणे कोकाटे यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे. या प्रकरणांनंतर उपमुख्यमंत्री अजि पवार कोकाटे यांचा राजीनामा घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र तसे झाले नाही, बैठकी दरम्यान केवळ कोकाटे यांना समज देण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात छावा संघटना आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Manikrao Kokate |
सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान छावा संघटनेचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. Manikrao Kokate |
हेही वाचा :
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट.! जुलै-ऑगस्टचे ३ हजार रुपये एकत्र मिळणार?





