Pune District : आंब्यांच्या झाडांना थंडीमुळे फुटू लागला मोहोर

वाल्हे : मागील आठवड्यापासून कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम होऊन आंब्याच्या झाडांना मोहोर फुटत आहे. आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्यासाठी थंडीची गरज असते. सध्या केशर आंब्याच्या झाडांना मोहोर फुटत आहे.
या जातीच्या झाडांना लवकर मोहोर येत असतो. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील केशर आंब्याचा हंगाम एप्रिल, मे मध्येच मिळू शकेल अशी शक्यता आंबा उत्पादकांमधून वर्तवली जात आहे. तसेच हापूस, पायरी या अंब्याच्या झाडांना उशिरा मोहोर फुटत असतो. त्यामुळे तालुक्यातील या जातीच्या फळांचा हंगाम मे महिन्यांच्या दरम्यान सुरू होतो.
केशरचे फळ लवकर येते. त्यामुळे त्याला चांगला भाव मिळतो. तसेच खाण्यास चव चांगली असल्यामुळे हापूसच्या बरोबरीने दर मिळतो. झाडाची उंची कमी असते. त्यामुळे फळ काढणी, औषध फवारणी करणे सोयीचे होते. तसेच लागवडी पासून दोन ते तीन वर्षात फुटत उत्पादन सुरू होते. त्यामुळे सद्यःस्थितील केशर आंब्याची लागवड करण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.





