Manav Suthar Records : भारताला सापडला नरेंद्र हिरवानीनंतरचा सर्वात मोठा मॅचविनर; मानव सुथारने मोडला आबिद अलींचा ५९ वर्षांचा विक्रम
Manav Suthar Records : मानव सुथार भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्या डावात 'सर्वोत्तम गोलंदाजी' करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Manav Suthar Historic 6 Wickets Records Afghanistan Test Debut : भारतीय क्रिकेट संघाला भविष्यासाठी आणखी एक हुकमी फिरकी स्टार मिळाला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध मुल्लानपूर येथे कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या मानव सुथार या २३ वर्षांच्या डाव्या हाताच्या फिरकीपटून आपल्या पहिल्याच डावात असा काही कहर केला की, त्याचे नाव थेट इतिहास पुस्तकात नोंदवले गेले आहे. पहिल्या डावात अफगाणिस्तानला १५२ धावांवर गुंडाळण्यात सुथारने मुख्य भूमिका बजावली. त्याने अवघ्या ३३ धावांमध्ये ६ विकेट्स घेत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले.
भारताच्या १३६ वर्षांच्या इतिहासातील दुसरा सर्वोत्तम गोलंदाज! (Manav Suthar Records)
या शानदार कामगिरीसह मानव सुथार भारतासाठी पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्या डावात ‘सर्वोत्तम गोलंदाजी’ करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतासाठी हा सर्वकालीन रेकॉर्ड नरेंद्र हिरवानी यांच्या नावावर आहे, ज्यांनी १९८८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ६१ धावांत ८ विकेट्स घेतल्या होत्या. आता मानव सुथारने (६/३३) या यादीत १९६७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५५ धावांत ६ विकेट्स घेणाऱ्या आबिद अली यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. (Manav Suthar Records )
The first of many to come ✨
Manav Suthar caps off a dream debut with the Player of the Match award 👏
Relive his spell ▶️ https://t.co/UXQVUy1QqX#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1VzsrkJiY4
— BCCI (@BCCI) June 8, 2026
२१ व्या शतकात पदार्पणात ५ हून अधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय! (Manav Suthar Records)
Leaving New Chandigarh with a massive win under the belt 🇮🇳
A complete team performance from #TeamIndia 🤍
Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MxUFJHvoq4
— BCCI (@BCCI) June 8, 2026
विशेष म्हणजे, २१ व्या शतकात (वर्ष २००० नंतर) कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा मानव सुथार हा भारताचा केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही किमया २००८ मध्ये अमित मिश्राने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (५/७१) केली होती. एकूण विचार केला तर कसोटी पदार्पणात ५ विकेट्स घेणारा तो भारताचा १० वा (स्पिनर्समध्ये ७ वा) गोलंदाज ठरला आहे. तसेच, अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत ही जगातील दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी ठरली; यादीत वेस्ट इंडिजचा रहकीम कॉर्नवाल (७/७५, वर्ष २०१९) पहिल्या क्रमांकावर आहे. (Manav Suthar Records)
मानव सुथारने सामन्यात अचूक लाईन-लेन्थ आणि चेंडूच्या वळणावर अप्रतिम नियंत्रण दाखवत अफगाण फलंदाजांना खेळणे अशक्य केले. ज्यामुळे भारताने तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तान एक डाव आणि ३०० धावांनी पराभव केला. यासह भारताने आपला ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत कसोटी क्रिकेटमधल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. मानवने गोलंदाजीव्यतिरिक्त त्याने भारताच्या पहिल्या डावात २८ धावांचे मोलाचे योगदान दिले होते. त्यामुशे तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे. (Manav Suthar Records)





