Rohit Sharma : हिटमॅनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचण्याची संधी! ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू

रोहित शर्माची आतापर्यंतची कामगिरी –
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ वनडे सामन्यांमध्ये ८८ षटकार लगावले आहेत. आगामी मालिकेत १२ षटकार पूर्ण केल्यास, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत १०० षटकारांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. या मालिकेत रोहित हा ऐतिहासिक विक्रम नोंदवतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज –
- रोहित शर्मा : ८८ षटकार (४६ सामने)
- इयोन मॉर्गन : ४८ षटकार (५७ सामने)
- सचिन तेंडुलकर : ३५ षटकार (७१ सामने)
- एमएस धोनी : ३३ षटकार (५५ सामने)
- ब्रेंडन मॅक्युलम : ३३ षटकार (४७ सामने)
हेही वाचा – Rohit Sharma : ‘हो, मी २०२७ चा विश्वचषक खेळणार…’, रोहितने खास चाहत्याला दिला शब्द, VIDEO होतोय व्हायरल
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी संघ:
भारत : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ऑस्ट्रेलिया : मिशेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, जॉश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुन्हेमन, मार्नस लाबुशेन, मिशेल ओवेन, जॉश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल स्टार्क.
हेही वाचा – Mohammed Shami : ‘त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या…’, शमीने फेटाळला आगरकरांचा दावा; म्हणाला, माझी गोलंदाजी…
ही मालिका रोहित शर्मासाठी तसेच भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. चाहत्यांना या मालिकेत रोहितच्या फलंदाजीची आणि त्याच्या विक्रमी कामगिरीची आतुरता आहे.





