Mamata Banerjee : मुक्त निवडणुका आता अशक्य; ममता बॅनर्जी यांची टीका
समान नागरी संहितेला (युसीसी) तृणमूल काॅंग्रेसचा (Mamata Banerjee) विरोध आहे. अशातच देशभर पाच राज्यांच विधानसभा निवडणुका सुरु असतानाच महिला आरक्षणासाठी संसदेचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे.

Mamata Banerjee : समान नागरी संहितेला (युसीसी) तृणमूल काॅंग्रेसचा (Mamata Banerjee) विरोध आहे. अशातच देशभर पाच राज्यांच विधानसभा निवडणुका सुरु असतानाच महिला आरक्षणासाठी संसदेचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये अर्थातच सीमांकनाचा मुद्दाही चर्चेत असेल.
म्हणजेच इथून पुढे भाजपाच्या राजवटीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या संकल्प पत्रावर जोरदार टीका केली. जर तृणमूल काॅंग्रेस बहुमताने सत्तेवर आली, तर आम्ही युसीसी विधेयक रद्द करु, असेही त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, संसदेत ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि त्यासाठी पुरेशी चर्चाही केली जात नाहीये. यामागील उद्देश बंगालचे विभाजन करणे आणि येथे एनआरसी लागू करणे हाच आहे. मी पुन्हा एकदा हे ठामपणे सांगते की, भाजपचा अस्त लवकरच होईल, तो दिवस आता फार दूर नाही.
एसआयआरला विरोध कायमच
ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला अर्थात सरला आपला असलेला विरोधही पुन्हा एकदा व्यक्त केला. त्यांनी या प्रक्रियेचे वर्णन भाजपला सत्तेवर आणण्याचा एक प्रयत्न असे केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, आमचा लढा व्हॅनिश कुमार यांच्याशी आहे. एसआयआर मोहिम म्हणजे एक मोठा घोटाळा आहे. मतदारांची नावे वगळळण्याचा हा घोटाळाच आहे. आमच्या राज्यात ९० लाख नावे वगळण्यात आली आहेत. हे आक्षेपार्ह आहे.






