Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवत विरोधकांना (Mamata Banerjee) मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देबांशु पांडा यांनी तब्बल १,०९,०२१ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. सुरुवातीपासूनच मतदारांनी भाजपच्या बाजूने एकतर्फी कौल दिल्यामुळे पांडा यांनी एक लाखांहून अधिक मतांचे मोठे मार्जिन गाठले. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (Mamata Banerjee) उमेदवार जहांगीर खान यांनी आधीच माघार घेतली होती, तर मुख्य लढतीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. रविवारी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी पार पडली आणि निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष सुरू केला. या ऐतिहासिक यशानंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांनी फाल्टाच्या मतदारांचे आभार मानले असून, “मी फाल्टाच्या जनतेला मनापासून सलाम करतो,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. Mamata Banerjee दरम्यान, भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भंडारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, या निकालामुळे तथाकथित ‘डायमंड हार्बर मॉडेल’ आता पूर्णपणे कोसळले असून ‘भाईयो’ चा अहंकार पराभूत झाला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींचे खंबीर नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवूनच जनतेने भाजपला ही मोठी सत्ता सोपवली आहे. फाल्टा मतदारसंघातील ही निवडणूक (Mamata Banerjee) सुरुवातीपासूनच प्रचंड वादग्रस्त ठरली होती. गेल्या २९ एप्रिल रोजी येथे मुख्य मतदान झाले होते, परंतु त्यादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमवर चक्क अत्तर शिंपडणे आणि चिकट टेप लावल्याचे धक्कादायक प्रकार घडले होते, तसेच वेब कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्येही छेडछाड झाल्याचे आढळले होते. या सर्व प्रकारांची दखल घेत निवडणूक आयोगाने २९ एप्रिल रोजी झालेले मतदान रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारसंघातील सर्व २८५ बूथवर २१ मे रोजी अत्यंत कडक सुरक्षेत पुन्हा मतदान घेण्यात आले. या पुनर्मतदानासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तब्बल ३५ कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या मतदानाचा निकाल अखेर रविवारी समोर आला, ज्यामध्ये जनतेने भाजपच्या बाजूने कौल देत देबांशु पांडा यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.