Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, पेपर लीक, घटणारी गुंतवणूक आणि रुपयाची घसरण या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असतानाही मोदीजी आपले पीआर स्टंट सुरूच ठेवून आहेत, अशी टीका खर्गे यांनी केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा (Mallikarjun Kharge) एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यामध्ये मोदी त्यांना मेलोडी चॉकलेट भेट देताना दिसत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर, आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक पोस्टर शेअर करत भाजपवर निशाणा साधला. त्यांनी या पोस्टरला लूट ही भाजपसाठी मेलोडी (मधुर) आहे, पण जनतेसाठी मिझरी (कष्टप्रद) आहे! असे शीर्षक दिले आहे. २०१४ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ४१४ रुपये होती, ती २०२६ मध्ये १२१ टक्क्यांनी वाढून ९१५.५ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरचे दर १५४ टक्क्यांनी वाढून १,२४१ रुपयांवरून थेट ३,१५२ रुपये झाले आहेत. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेकडून ४३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. Mallikarjun Kharge सीएनजी, दूध, ब्रेड आणि औषधांच्या किमतीही सातत्याने वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. मार्च २०२६ मध्ये १५ ते २९ वयोगटातील तरुण बेरोजगारीचा दर १५.२ टक्क्यांवर पोहोचला असून, हा गेल्या नऊ महिन्यांतील उच्चांक आहे. भाजपच्या १० वर्षांच्या राजवटीत ९० वेळा परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत, ज्यामुळे सुमारे ९ कोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि भरती प्रक्रियेची विश्वासार्हता संपली आहे. मोदी सरकारच्या (Mallikarjun Kharge) गेल्या ११ वर्षांत प्रत्येक भारतीयावरील सरासरी कर्ज ११ पटीने वाढले आहे. दुसरीकडे, देशातील २२९ बड्या उद्योगपतींची आणि २६ नवीन अब्जाधीशांची संपत्ती ९७.५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. भारतीय रुपया ९६.९० च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे गेल्या दोन महिन्यांत भारताचा परकीय चलन साठा ३८ अब्ज डॉलर्सने घटला आहे.या आर्थिक संकटामुळेच देशातील ८० कोटी जनतेला ५ किलो मोफत रेशनवर अवलंबून राहावे लागत आहे, असा टोला खर्गेंनी लगावला.