Mallikarjun Kharge । राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. खरगे यांनी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना सवाल करत “सभागृह कोण चालवत आहे, ते की गृहमंत्री अमित शाह. ? असे म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत विरोधकांनी बराच गोंधळ घातला आहे. ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन आढावा (एसआयआर) हा मुद्दा बनवण्यात आला. खरगे म्हणाले की, “विरोधकांना सभागृहात सीआयएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप आहे.” त्यानंतर त्यांच्यात आणि सभापतींमध्ये जोरदार वाद झाला. खरगे यांनी सभागृहाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि उपसभापतींनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. खरगे यांचे सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप Mallikarjun Kharge । खरगे यांनी आरोप केला की, “संसदेत जनहिताचे मुद्दे उपस्थित करण्यापासून विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखले जात आहे”. त्यांनी सांगितले की तुम्ही सीआयएसएफला आत आणा. आमचे संसद कर्मचारी येथे सक्षम आहेत, परंतु तुम्हाला पोलिस आणि लष्कर आणून सभागृह चालवायचे आहे.”असा थेट सवाल देखील त्यांनी केला. खरगे यांच्या आरोपांवर किरण रिजिजू काय म्हणाले? Mallikarjun Kharge । संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी हे आरोप फेटाळून लावले. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना किरण रिजिजू म्हणाले, “विरोधी पक्षनेते सभागृहात सैन्य आणि पोलिसांबद्दल बोलले, परंतु हे खोटे आहे. सभागृहात फक्त मार्शल असतात आणि सभागृहात फक्त मार्शलच येतात.” त्यांनी उपसभापतींना विचारले की अशा खोट्या तथ्यांबद्दल विरोधी पक्षनेत्यावर काय कारवाई करावी?