Malaysia Masters : एचएस प्रणॉयने रचला इतिहास, मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे पटकावले विजेतेपद

क्वालालंपूर :– भारताचा अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणोय याने आपल्या शिरपोत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्याने येथे सुरू असेलल्या मलेशिया एपन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावताना इतिहास घडवला आहे.
प्रणोयने अंतिम लढतीत चीनच्या वेंग हॉंग यांग या बलाढ्य खेळाडूवर 21-19, 13-21, 21-18 अशी तीन गेममध्ये मात केली. गेल्या वर्षी थॉमस करंडक स्पर्धेत भारताने मिळवलेल्या विजयात प्रणोयचा मोठा वाटा होता मात्र, त्याने वैयक्तिक स्तरावर 2017 सालानंतर हे पहिलेच एकेरीचे आंतरराष्ट्रीय विजेतेपद प्राप्त केले आहे.
2017 साली त्याने युएस ओपन ग्रांप्री स्पर्धे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले होते. मुळचा केरळचा असलेला प्रणोय गेशाचा सध्याच्या देशाचा मानांकित खेळाडू समजला जातो. त्याची यंदीा वाटचाल अत्यंत थाटात झाली आहे. गेल्या वर्षी त्याला संमिश्र यश मिळाले होते. त्याने स्वीस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता मात्र, त्यावेळी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तसेच गेल्या वर्षी त्याला इंडोनेशिया व मलेशिया सुपर 1000 सीरीज स्पर्धांमध्येही उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारता आली होती.
प्रणोयने मलेसिया मास्टर्स स्पर्धेत मिळवलेले यश भारतासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे किजाम्बी श्रीकांत व लक्ष्य सेन यांना पुरुष एकेरीत अपयश आले होते तर दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पुरुष एकेरीत सर्व आशा प्रणोयवरच केंद्रित झाल्या होत्या.





