Paris Olympics 2024 (Badminton) : प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रणय आणि लक्ष्य येणार आमनेसामने, दोघांपैकी एका भारतीयाचे पदकाचे स्वप्न भंगणार

Paris Olympics 2024 (Badminton,Prannoy H. S. vs L. Sen) : पॅरिस ऑलिम्पिकचा सहावा दिवस भारतासाठी खूप संस्मरणीय असणार आहे. आज दोन भारतीय खेळाडू आमनेसामने येणार आहेत. बॅडमिंटन पुरुष एकेरीत, लक्ष्य सेनचा सामना उप-उपांत्यपूर्व फेरीत देशबांधव एचएस प्रणॉयशी होईल. आजचा सामना भारत जिंकणार हे निश्चित पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका भारतीयाचा प्रवास संपणार हेही निश्चित.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे दोन स्टार बॅडमिंटनपटू गुरुवार 1 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5.40 वाजता आमनेसामने येणार आहेत. एकमेकांसोबत खेळून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लक्ष्य आणि प्रणयपैकी एकालाच पुढे जाता येणार आहे.
🏸 Lakshya Sen will compete against compatriot HS Prannoy in the Men’s Singles Round of 16.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Badminton @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @Media_SAI @IndiaSports @DDIndialive @DDNewslive @DDNational @BAI_Media @lakshya_sen @PRANNOYHSPRI pic.twitter.com/harimR2Y6y
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 1, 2024
भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयने बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या बॅडमिंटन पुरुष एकेरी गटाच्या लढतीत व्हिएतनामच्या ले डक फाटचा 16-21, 21-11, 21-12 असा पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे बुधवारीच भारताचा युवा शटलर लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या गटात इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा 21-18, 21-12 असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती.





