Singapore Open 2024 : भारताला आणखी एक धक्का, सिंधूनंतर एच.एस प्रणॉयचेही आव्हान संपुष्टात…

Singapore Open 2024 : कलंग येथे सुरू असलेल्या सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2024 बीडब्लूएफ सुपर 750 स्पर्धेत गुरूवारी भारताला आणखी एक धक्का बसला. महिला बॅडमिंटन पी.व्ही सिंधूनंतर याच स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयलाही पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीत निराशेचा सामना करावा लागला.
एचएस प्रणॉयला (H.S. Prannoy) खालच्या मानांकित जपानच्या केंटा निशिमोतेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 1 तास 18 मिनिटे चाललेल्या या लढतीत जपानच्या शटलरने जगातील 10व्या क्रमांकाच्या भारतीय खेळाडूचा 21-13, 14-21, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तर पराभवानंतर प्रणॉय स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
Prannoy falls short in a sensational pre-quarters encounter despite making a comeback in second game.
Well played champ!
📸: @badmintonphoto #SingaporeOpen2024#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/N5V4bp8Dug
— BAI Media (@BAI_Media) May 30, 2024
याआधी सिंगापूर ओपनच्या महिलाच्या आणखी एका सामन्यात, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती जागतिक क्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेली भारताची पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत एका खडतर लढतीत 21-13,11-21, 20-22 अशी पराभूत होऊन सिंगापूर ओपनमधून बाहेर पडली. सिंधूला तिची कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मारिन हिने पराभवाचा धक्का दिला.
Singapore Open 2024 : भारताच्या ‘त्रिशा-गायत्री’चा विजयी धमाका, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक….
दरम्यान, बुधवारी राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत पुरुष एकेरी गटात आधीच स्पर्धेबाहेर झाले होते. लक्ष्यला अव्वल मानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला तर श्रीकांत दुखापतीमुळे निवृत्त झाल्यामुळे स्पर्धेत आगेकूच करू शकला नाही.





