Australian Open 2024 | प्रणॉयला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का…

Australian Open 2024 | – भारताचा अव्वल मानांकित एकेरी खेळाडू एच.एस. प्रणॉयला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाकडून 19-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला.
या सुपर 500 स्पर्धेत भारताच्या कोणत्याही खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीच्या पलीकडे प्रगती करण्यात यश आले नाही. जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयच्या पराभवापूर्वी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि महिला एकेरीत अकार्षी कश्यप याशिवाय सिक्की रेड्डी आणि बी सुमीथ रेड्डी या मिश्र जोडीला अंतिम आठमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
T20 World Cup 2024 : भारत-कॅनडा आज आमने-सामने; सामन्यावर पावसाचे सावट…
मिश्र दुहेरीत सुमित आणि सिक्की या आठव्या मानांकित पती-पत्नी जोडीलाही जियान झेन बँग आणि वेई या झिन या अव्वल मानांकित जोडीकडून पराभव पत्करावा लागला. बँग आणि शिन यांनी 21-12, 21-14 असा आरामात विजय नोंदवला.





