Makrand Patil : वाईत अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उत्साह; ना. मकरंद पाटलांनी दिले विकासाचे आश्वासन
Makrand Patil : मोहडेकरवाडी येथे आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करत स्थानिक विकासाची आश्वासने दिली.

Makrand Patil – मराठी साम्राज्याचा विस्तार करण्याबरोबरच रुढी, परंपरा बदलून, लोकोपयोगी कामे करुन समाजव्यवस्था बदलण्याचे कार्य अहिल्यादेवींनी केले, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले. मोहडेकरवाडी-वळकुंदेवाडी (ता. वाई) येथे राजमाता ग्रुप आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्या वृषाली चव्हाण, शशिकांत पवार, शैलेश सपकाळ, गणेश धायगुडे, तानाजी कचरे, विकास धायगुडे, दादासाहेब गायकवाड, शैला काळे, सुजाता जगताप बशीर इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. मकरंद पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी विहिर अधिग्रहण, मोहडेकरवाडी रस्ता लवकर केला जाईल, तसेच धनगर आरक्षणाचे सुरवातीपासून आपण समर्थक असून, शिंग्रोबा धनगराचे नाव मिसिंग लिंकला देण्याची मागणी रास्त असल्याचे ते म्हणाले.
यावेळे अॅड. अविनाश धायगुडे, गणेश केसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. धनंजय वळकुंदे, गुणवंता वळकुंदे, जयश्री वळकुंदे, संदीप वळकुंदे, अश्विनी वळकुंदे, नामदेव वळकुंदे, हणमंत वळकुंदे, महेंद्र वळकुंदे, विकास वळकुंदे, सतीश वळकुंदे, साधना वळकुंदे यांनी स्वागत केले. अजय वळकुंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कुमार जगताप, तुकाराम कोळेकर, अमोल कदम, अविनाश चव्हाण, प्रमोद पोळ आदी उपस्थित होते





