Shivsena : पक्षाअंतर्गत मोठी कारवाई; शिवसेनेने ‘या’ जिल्ह्यात अख्खी कार्यकारिणीच केली बरखास्त कारण…
Solapur Shivsena : शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यात पक्षाअंतर्गत मोठी कारवाई केली असून, स्थानिक राजकीय वर्तुळात या कारवाईची चर्चा आहे.

Solapur Shivsena : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर पक्षात मोठी संघटनात्मक कारवाई करण्यात आली आहे. माढा आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख स्तरावरील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील वाद आणि नाराजी उघडपणे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख आणि इतर पदांच्या निवडीवर तसेच कामकाजावर आक्षेप घेतला. यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला. या पार्श्वभूमीवर पक्षाने कठोर पाऊल उचलत कारवाई केली आहे. ही कारवाई अनेकांसाठी इशारा असल्याचे बोलले जात आहे.
शिंदेंच्या आदेशानंतर कारवाई
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाचे मुख्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांनी माढा आणि सोलापूरमधील कार्यकारिणी बरखास्त केल्याचे पत्र जारी केले. (Shivsena)
)
Shivsena : पक्षाअंतर्गत मोठी कारवाई; शिवसेनेने ‘या’ जिल्ह्यात अख्खी कार्यकारिणीच केली बरखास्त कारण…
पुढील काळात जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदांची निवड मुख्य पक्ष कार्यालयातूनच केली जाणार असून, संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन नियुक्त्या केल्या जातील. तोपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या शिवसैनिकांची नोंद घेऊन त्यांच्या कामगिरीच्या आधारे पुढील पदे दिली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून असंतुष्ट पदाधिकारी आपल्या गळाला लागतात का, याची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार संतोष बांगर आक्रमक (Shivsena)
नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते. येथील आढावा बैठकीत जोरदार खंडाजंगी झाली. पक्षाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्याच मंत्र्यांना घराचा आहेर दिला. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे अशा मंत्र्यांना घरी बसवा, या तीव्र शब्दांत बांगर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच उघडपणे नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांना फोन केल्यानंतर ते फोन उचलत नसल्याचे खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
हेही वाचा : Sonia Gandhi : सोनिया गांधींनी आशाताईंच्या कुटुंबाला पाठवले शोकपत्र; पण घडली मोठी चूक…





