Sonia Gandhi : सोनिया गांधींनी आशाताईंच्या कुटुंबाला पाठवले शोकपत्र; पण घडली मोठी चूक…
Sonia Gandhi : आशा भोसले यांना तीन मुले होती. त्यापैकी एक मुलगा आणि एका मुलीचे निधन झाले आहे.

Sonia Gandhi : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीपासून क्रीडाक्षेत्रापर्यंत सर्वच स्तरांतून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
मात्र आशाताईंच्या अंत्यसंस्काराला येता न आल्याने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्र पाठवत कुटुंबाचे सांत्वन केले आहे. मात्र या पत्रात मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोनिया गांधी यांनी एक शोकपत्र लिहिले असून हे पत्र त्यांनी आशाताईंचे पुत्र आनंद आणि हेमंत भोसले यांच्या नावाने पाठवले आहे. सोनिया गांधी यांनी या पत्रात हेमंत भोसले यांचे देखील सांत्वन केले आहे.
मात्र आशा ताईंचे पुत्र हेमंत भोसले यांचे निधन ११ वर्षापूर्वी २०१५ साली कर्करोगामुळे झाले आहे. मृत हेमंत भोसले यांच्या नावाने पत्र आल्याने ही गंभीर बाब समजली जात आहे. आशा भोसले यांना तीन मुले होती. त्यापैकी एक मुलगा आणि एका मुलीचे निधन झाले आहे.
आशा भोसलेंना तीन मुले
हेमंत भोसले: सर्वात मोठा मुलगा. ते संगीतकार होते. 2015 मध्ये कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले.
वर्षा भोसले: आशा भोसले यांची एकुलती एक मुलगी. वर्षा भोसले या एक प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखिका होत्या. 2012 मध्ये त्यांचेही दुःखद निधन झाले.
आनंद भोसले: सर्वात लहान मुलगा. आनंद यांनी बिझनेसमध्ये शिक्षण घेतले आहे आणि सध्या ते आपल्या आईचे कामकाज सांभाळत आहेत.
तर आशा भोसलेंची नात जनाई भोसलेने सोशल मीडियारून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “भावनांचा पूर आला आहे… योग्य वेळी मी नक्की लिहीन,” असे सांगत तिने लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “त्या या सन्मानास पात्र होत्या आणि त्या कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील,” असेही तिने म्हटले आहे.
हेही वाचा:
Ashok Kharat : अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? काँग्रेस खासदाराने कारणं सांगत केला मोठा दावा






