Paatallok Seasan 2 : “मै पाताललोक का परमन्ट निवासी हूँ” ; दुसऱ्या भागाचा ट्रेलर आऊट, नवी केस नवे आरोपी कथा जाणार नागालँडपाशी

पाताललोक सीजन २ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिरीजच्या पहिल्या सीजनने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळावलेली होती. या सिरीजचा दुसरा सीजन कधी येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर या सिरीजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून १७ जानेवारीला पाताललोक २ सिरीज प्राईमवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. गुन्हेगारी, पोलीस यंत्रणा यावर बेतलेल्या या सिरीजचा पहिला भाग रक्तरंजित आणि थ्रिलर होता. या सिरीजमध्ये जयदीप इलाहवत याने हाथीराम चौधरी या पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारले होते. पुन्हा एकदा नवी केस घेऊन हाथीराम चौधरी सर्वांच्या भेटीला येणार आहे.
या नव्या केसमध्ये नागालँड येथील एका पार्टाच्या लीडरचा खून झालेला आहे. तसेच दिल्लीतून एक मुलगी बेपत्ता आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी कनेक्टेड आहेत. या प्रकरणाचा तपास करीत असताना या घटनेचे कनेक्शन नागालँड येथील घटनेशी असल्याचे दिसते. जॅानथॅान नावाच्या माणसाचा खून झालेला आहे. यामुळे तपास करण्यासाठी चौधरी आणि त्यांच्या टीमला त्या ठिकाणी जाव लागतं. यामध्ये नेमकं काय काय घडतं ? या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ? की आणखी काही ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी १७ जानेवारीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
या सिरीजमध्ये आधीची काही पात्र असून नवीन पात्र देखील दिसत आहेत. सिरीजच्या सुरुवातीचा डॅायलॅाग बऱ्याच गोष्टी सांगणारा आहे. तो डॅायलॅाग असा आहे,” सिस्टम एक नाव के तरह है चौधरी… सबको पता है इसमे एक छेद है…. तु वऐसाही है…. की नाव बचाने की कौशिश कर रहा है… तू मरेगा चौधरी…. तू मरेगा….!





