Panchayat Season 4 : खळखळून हसायला तयार राहा! पंचायतचा चौथा सिजन या दिवशी होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Panchayat Season 4 : ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय असेलल्या पंचायत सिरीजचा पुढचा म्हणजेच चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच पंचायत ४ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आता ही सिरीज ओटीटीवर येण्यापूर्वी निर्मात्यांनी एक मोठं सरप्राईज दिले आहे. या सिरीजचविषयीची एक नवीन पोस्ट समोर आली आहे. ज्यामुळे चाहते उत्सुक झाले आहेत.
‘पंचायत’ ही आतापर्यंतची सर्वाधिक पसंती मिळालेली वेब सिरीज आहे. हलक्याफुलक्या देसी कॉमेडीसह बनलेल्या ‘पंचायत’ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आतापर्यंत या सिरीजचे ३ सिजन रिलीज झाले असून तिन्हीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता काही महिन्यांमध्ये या सिरीजचा नवा म्हणजेच चौथा सिजन रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
पंचायत सीजन ४ या वर्षी २ जुलैपासून अमेझॉन प्राइम ओटीटीवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. पोस्टमधून चाहत्यांसाठी एक नवीन भेट आली आहे. प्राइम व्हिडिओच्या इंस्टाग्राम पेजवरील पोस्टमधून सांगण्यात आले आहे की पंचायत सीझन स्ट्रीम केला जाईल. “जर पंचायत लवकरच आली तर मी करेन…, “तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये विचारला आहे. यावर चाहत्यांने भरभरून कमेट्ंस केल्या आहेत. “मी प्राइम व्हिडिओची सदस्यता घेईन.” दुसऱ्याने म्हटले, “मी त्या दिवसाच्या सर्व बैठका रद्द करेन ,असे उत्तर चाहत्यांनी दिले आहे.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात उंच पुलाचे केले उद्घाटन ; पुलावर हातात तिरंगा घेऊन चालले





