श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; फॅमिली मॅन ३ या दिवशी होणार रिलीज

The Family Man 3 : प्राइम व्हिडिओवरील अत्यंत लोकप्रिय फॅमिली मॅन ३ वेबसिरीजचा तिसरा सिजन कघी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. याबाबत एक अपडेट समोर आली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी याने तिसऱ्या सिजनची रिलीज डेट सांगितली आहे.
फॅमिली मॅन ही खूप लोकप्रिय झालेली वेबसिरीज आहे. या सिरीजच्या याआधीच्या दोन्ही सिजनने धूमाकूळ घातला होता. त्यानंतर या सिरीजचा तिसरा सिजन कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आता प्रतिक्षा संपली असून, ३ नोव्हेंबर २०२५ मध्ये ही वेबसिरीज स्ट्रीम होईल, असे सांगण्यात आले आहे.
फॅमिली मॅन ही प्राइम व्हिडिओ ओटीटीवरील बहुचर्चित वेबसिरीज आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, ओटीटीप्ले अवॉर्ड्स २०२५ दरम्यान, मनोज बाजपेयी याने तिसऱ्या सीझनची प्रीमियर डेट सांगितली आहे. मनोज याच्या म्हणण्यानुसार ‘द फॅमिली मॅन ३’ नोव्हेंबर २०२५ मध्ये स्ट्रीम होईल. यामुळे तिसऱ्या सिजनमध्ये काय खास असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
View this post on Instagram
या वेबसिरीजचा तिसरा सिजन आधीच्या दोन सिजनपेक्षा अॅक्शनने भरलेला असणार आहे. या नव्या सिजनमध्ये अभिनेता जयदीप अहलावत याची एन्ट्री होणार असून, तो सिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. जयदीप अहलावत हा त्याच्या स्क्रिन प्रेझेन्ससाठी ओळखला जातो. त्याला या वेबसिरीजमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. ‘द फॅमिली मॅन ३’ चं दिग्दर्शनाची जबाबदारी पुन्हा एकदा राज आणि डीके सांभाळणार आहेत.
हेही वाचा: ‘तेरे इश्क मे’च्या सेटवरील धनुषचा फोटो लीक; खास अंदाजात दिसला अभिनेता





