Mahira Khan : रणबीरसोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर माहिरा खानचं स्पष्टीकरण; सांगितला धक्कादायक अनुभव, “काही काळानंतर…”

Updated On:
Photo 1

Mahira Khan  – बॉलीवूड कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतात. अभिनेता शाहरुख खानच्या 2017 साली रिलीज झालेल्या ‘रईस’ चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान देखील नेहमीच चर्चेत असते. माहिराची ‘हमसफर’ ही फवाद खानसोबतची पाकिस्तानी मालिका भारतातही खूप गाजली. महिरा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.

बॉलिवू़ड पदार्पणावेळी माहिराचे नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते. रणबीर कपूरसोबतचे तिचे स्मोकिंग करतानाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे चांगलीच खळबळ माजली होती. आता नुकतंच माहिराने ती घटना आठवत प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने या फोटोंबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमुळे कश्या पद्धतीने तीच संपूर्ण करिअर आणि आयुष्य संपण्याच्या मार्गावर आलं होत. यावर माहिराने भाष्य केलं आहे. ‘बीबीसी एशियन नेटवर्क’सोबत बातचीत करताना माहिरा खानने सिनेसृष्टीतील संघर्ष, घटस्फोट, दुसरं लग्न आणि रणबीर कपूरसोबतचे ते फोटो या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं.

हे सांगताना ती म्हणाली की ‘या प्रवासात मला चाहत्यांनी खूप पाठिंबा दिला. घटस्फोटानंतर मुलाची जबाबदारी होती. कित्येक वर्ष एकटं राहणं, इंटरनेटवर फोटो व्हायरल होणं आणि दुसऱ्या देशात बॅन होणं हे सगळंच माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला एकटीलाच याच्याशी सामना करावा लागला होता. मी कोणासोबत काहीच शेअरही करु शकत नव्हते’. असं यावेळी तिने सांगितलं.

व्हायरल झालेल्या त्या फोटोंविषयी बोलताना अभिनेत्री सांगते की, “जेव्हा फोटो समोर आले तेव्हा ‘द लिटिल व्हाईट ड्रेस’ नावाचा एक लेख बीबीसीमध्ये प्रकाशित झाला होता. मी त्या लेखाचं वैशिष्ट्य समजण्यात अयशस्वी झाले होते. मला आठवतं की मी वाचलं आणि विचार केला की ‘माझं करिअर संपलंय का?”.

त्या लेखात असं लिहिलं होते की, ‘ही एक महिला आहे जिने असं यश मिळवले आहे जे पाकिस्तानमध्ये कोणीही मिळवलेलं नाही. आणि आता ते सर्व संपलं आहे. तिच्यासोबत आता काय होणार आहे?’ मी ते वाचल्यानंतर फार चिंताग्रस्त झाले होते. मला वाटलं आता माझं करिअर संपलं. पण मी स्वत:चीच समजूत घातली. काही काळानंतर आपोआप हे थांबेल, लोक विसरुन जातील असं मी स्वत:ला समजावलं.

मी काही काळ सर्वांपासून दूर गेले. जसा वेळ गेला तसं सगळं पुन्हा सुरळीत झालं. याचा माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला” असं अभिनेत्री म्हणाली. दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये माहिरा खानने शॉर्ट व्हाईट ड्रेस घातला असून, अभिनेता रणबीर कपूरने राखाडी (ग्रे) रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचं दिसून येत. यावेळी हे दोन्ही कलाकार विदेशात असल्याचं सांगितलं गेलं.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?