Pune Politics : पुणे भाजप व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती
Pune Politics : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Pune Politics : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी युवा, गतिमान आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश गुप्ता यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाच्या प्रश्नांवर आक्रमक व परिणामकारक भूमिका घेतली आहे. शासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये त्यांची ठोस उपस्थिती आणि प्रभावी समन्वय क्षमता ही त्यांची विशेष ओळख आहे.
व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवायांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, समस्यांचे केवळ निवेदन नव्हे तर प्रत्यक्ष निकाल लावण्याची कार्यपद्धती त्यांनी निर्माण केली आहे.
भाजपा व्यापारी आघाडी ही केवळ संघटना नसून व्यापाऱ्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांची लढाई लढणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, अशी स्पष्ट भूमिका महेश गुप्ता यांनी मांडली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील व्यापारी वर्ग अधिक संघटित, सशक्त आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी होईल, असा ठाम विश्वास गुप्ता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.





