Ajit Pawar on election । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे एक विधान सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत येत आहे. आगामी निवडणुकीत राज्यात महायुतीचा विजय होणार आणि महायुतीचे सरकार येणार एवढंच नाही तर त्यामध्ये आपल्याला मोठे पद देखील मिळणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये प्रचारादरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे.
राज्यात महायुतीचे सरकार येणार… येणार… येणार… Ajit Pawar on election ।
यावेळी अजित पवार यांनी, “मागचं झालं गेलं आता गंगेला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झालं तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार… येणार… येणार. ते सरकार आपल्यानंतर आपल्याला तिकडे चांगलं पद मिळणार… मिळणार… मिळणार…, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यावर कार्यकर्त्यापैकी एकाने लगेचच म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार, असे म्हटले. त्यावर अजित पवार हसले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना केल्या. महिलांना सांगा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना बंद होणार नाही, हे सांगा, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अजित पवार बारामतीचा दौरा करणार Ajit Pawar on election ।
दरम्यान, निवडणुकीसाठी अजित पवारांच्या बारामती गाव भेट दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज सकाळी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी गाव भेट दौरा आखला आहे. या दौऱ्यात 59 गावांना भेटी अजित पवार देणार आहेत. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की मला राज्यात लक्ष द्यायचा आहे. त्याच्यामुळे मतदार संघात हा धावता अजित पवारांनी आखलेला आहे.. मतदारांना सरकारची भूमिका सरकारने आणलेल्या योजना अजित पवार समजावून सांगत आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा
राज्यातल्या निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ यांच्यावर मोठी जबाबदारी ; निवडणूक काळात ‘या’ भूमिकेत दिसणार