Maharashtra’s Chitrarath । Republic Day 2026 : देशाच्या राजधानी दिल्लीत होणाऱ्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा भव्य चित्ररथ सज्ज झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या आणि राज्य महोत्सव म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथ यंदा राष्ट्रीय पातळीवर सादर केला जाणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक आणि भव्य होत गेले. आज हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक चळवळ बनला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून आज कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असून, लाखो लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. चित्ररथातून मांडली जाणार आर्थिक साखळी यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये मूर्तीकार, सजावट आणि प्रकाशयोजना करणारे कारागीर तसेच कलाकार, वादक, ढोल-ताशा पथक, फुलविक्रेते, वस्त्रव्यवसायिक पर्यावरणपूरक साहित्य निर्माते यांना मिळणाऱ्या रोजगाराची आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या आर्थिक साखळीची प्रभावी मांडणी केली जाणार आहे. Maharashtra’s Chitrarath गणेशोत्सवामुळे स्थानिक कारागिरांना कशी रोजगारनिर्मिती होते आणि हा उत्सव आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला कसा हातभार लावतो, हे चित्ररथाच्या माध्यमातून अधोरेखित केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिन पथसंचलनाचे महत्त्व : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होणारे चित्ररथ हे देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. प्रत्येक चित्ररथ संबंधित राज्याची संस्कृती, परंपरा, सामाजिक विचार आणि विकासाची दिशा मांडतो. या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात एकूण 30 चित्ररथ सहभागी होणार आहेत. यामध्ये 17 राज्यांचे चित्ररथ असून, 13 केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ असतील. या चित्ररथांची निवड एका विशेष समितीद्वारे केली जाते. या समितीत नामवंत कलाकार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पद्म पुरस्कार विजेते यांचा समावेश असतो. दरवर्षी आलटून-पालटून राज्यांना संधी दिली जाते. यंदाच्या पथसंचलनात सहभागी होणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेश पुढीलप्रमाणे : महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश. हे देखील नक्की वाचा… Avinash Shilimkar : पुणे जिल्ह्याच्या सुपुत्राला उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक; ‘अविनाश शिळीमकर’ यांचा सन्मान Ahilyanagar Drugs Case : २ कोटींचे ड्रग्ज गायब करून तिथं ठेवलं पीठ; पोलिसाच्या ‘त्या’ कारनाम्यात खासदाराच्या कार्यकर्त्याचा हात? Mann Ki Baat : २०२६ ची पहिली ‘मन की बात’ ! पंतप्रधानांकडून मतदारांचे महत्त्व स्पष्ट ; स्टार्टअप्सबद्दल केले ‘हे’ मोठे विधान