Maharashtra Weather : राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट, अनेक ठिकाणी उन्हाचा चटका
Maharashtra Weather : हवामान विभागाने आज राज्यातील २४ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच आज महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Maharashtra Weather)
‘या’ २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसासाठी पोषक असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा कमकुवत झाला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Weather)
तसेच उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, मन्नारच्या आखातापासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंतही हवामान प्रणाली सक्रिय असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Maharashtra Weather)
अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
उत्तर अंदमान समुद्राच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. (Maharashtra Weather)
ही प्रणाली पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, २३ सप्टेंबरपर्यंत ती ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Maharashtra Weather)
सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर चंद्रपूरमध्ये ३५.८, अमरावती ३५.६, अकोला ३५.१, तर जेऊर, ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे प्रत्येकी ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. (Maharashtra Weather)
देसाईगंजमध्ये ६० मिमी पाऊस
शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा या कालावधीत राज्यातील सर्वाधिक नोंदवलेला पाऊस ठरला. (Maharashtra Weather)
Maharashtra Rain Update : मॉन्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज






