Maharashtra Rain Update : मॉन्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. मॉन्सूनने पश्चिम राजस्थानातून माघार घेतली असून राज्यातील पावसाचा जिल्हानिहाय अंदाज जाणून घ्या.

Maharashtra Rain Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, १९ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राजस्थानच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छमधूनही मॉन्सून माघार घेण्यास अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. अनेक भागांत मात्र पावसाची प्रतीक्षा कायम असून, काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यात आजपासून पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
१९ सप्टेंबर : रायगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे व सातारा घाटमाथा, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना आणि परभणी येथे हलका पाऊस अपेक्षित आहे.
Light to moderate rain/thundershowers with heavy rain, gusty winds 40-50 kmph at isolated places in districts of North Konkan.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 19, 2026
रविवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे विजांसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
सोमवार : पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे जोरदार पावसाचा इशारा आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
मंगळवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. ठाणे, रायगड, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली येथे विजांसह हलक्या सरी पडू शकतात.
बुधवार : रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड येथेही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.





