Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Weathe: शेतकरी वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. यातच आता राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी मुंबईसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आजही बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात सध्या पावसाचे अलर्ट देण्यात आले असून पुणे घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी ?
आज 19 जुलै रोजी पुणे, अहिल्यानगर,वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गोंदिया ,गडचिरोली, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आले आहेत. विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, जूनमध्ये यंदा उशिरा सुरू झालेला पाऊस अलनिनोच्या सावटामुळे आणखी लांबला. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची चिंतावाढली आहे. तर दुसरीकडे धरणसाठा खालावल्याने पाणीटंचाईचे सावटही घोंगावत आहे.
हेही वाचा:
PMC News: महापालिकेत आंधळा कारभार! प्रशासकीय काळात टाकलेल्या ड्रेनेज लाइनची आकडेवारीच नाही






