Maharashtra Voter List : राज्यात एसआयआरचे ८१.५४ टक्के अर्ज वितरित; आतापर्यंत ४५.०५ टक्के अर्जांचे डिजिटलायझेशन
Maharashtra Voter List : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेने मोठा वेग घेतला आहे.

Maharashtra Voter List : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेने वेग घेतला आहे. सोमवार सकाळपर्यंत मतदारांशी संबंधित माहिती संकलन अर्ज ८१.५४ टक्के वितरित करण्यात आले आहेत आणि ४५.०५ टक्के अर्जांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे, अशा माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिली आहे. (Maharashtra Voter List)
या मोहिमेतील माहिती संकलनाचा टप्पा ३० जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत राबविला जात आहे. ३० जून रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी एकूण ७ कोटी ९७लाख ९२ हजार ६२९ माहिती संकलन अर्ज वितरित करण्यात आले आहेत, तर ४कोटी ४०लाख ८६ हजार ३२८ अर्जांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. (Maharashtra Voter List)
ही मोहीम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मान्यतेने निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या १ लाख २५३ बूथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत राबविली जात आहे. (Maharashtra Voter List)
अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जांच्या वितरणाचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक नोंदवले गेले आहे; यामध्ये जळगाव (९९.७० टक्के), हिंगोली (९९.९५ टक्के), बुलढाणा (९९.४३ टक्के), धुळे (९८.७९ टक्के), अहमदनगर (९८.२५ टक्के), परभणी (९७.८५ टक्के) आणि गोंदिया (९७.७० टक्के) यांचा समावेश आहे. (Maharashtra Voter List)
डिजिटायझेशनच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा राज्यात आघाडीवर असून तिथे ७६.८९ टक्के अर्ज अपलोड करण्यात आले आहेत. त्यानंतर रत्नागिरी (७६.४० टक्के), चंद्रपूर (७२.१५ टक्के), परभणी (६८.६८ टक्के) आणि बुलढाणा (६६.८५ टक्के) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. (Maharashtra Voter List)
ही जिल्हावार आकडेवारी मतदार यादी पडताळणी प्रक्रियेदरम्यान माहिती संकलन अर्जांचे वितरण आणि डिजिटायझेशन यांमधील प्रगती दर्शवते. निवडणूक आयोगाने अलीकडेच महाराष्ट्रातील मतदार यादी पडताळणी प्रक्रियेसाठी १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया आता २९ जुलैऐवजी ८ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले. (Maharashtra Voter List)
प्रमुख जिल्ह्यांचा आकडेवारी
जिल्हा अर्जाचे वितरण (टक्केवारी) डिजिटलायझेशन
पूणे- ५६.५२ लाख (६२.२५ टक्के) – २५.०२ लाख (२७.५६ टक्के)
ठाणे – ३९.६० लाख(५३.१५ टक्के) – १३.८२ टक्के
मुंबई उपनगर – ४२.११ लाख (५३.७८ टक्के) – १३.०६ टक्के
मुंबई शहर – १४.९२ लाख (५८.३९ टक्के) – २२.०३ टक्के





