Vidhan Parishad Candidate : राज्यातील विधान परिषद निवडणुकीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू झाली आहे. मंगळवारी रात्री भाजपने आपल्या ६ उमेदवारांची यादी जाहीर करत निवडणूक रंगत आणली. (Vidhan Parishad Candidate) भाजपने यावेळी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले असून सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांचे नाव आधीच निश्चित झाले होते, तर उर्वरित उमेदवार निवडताना जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. (Vidhan Parishad Candidate) Vidhan Parishad Candidate : भाजपनंतर आता राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब? दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा नेते झिशान सिद्दिकी यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तसेच अमोल मिटकरी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad Candidate) याशिवाय शिवसेना शिंदे गटाकडूनही दोन उमेदवारांची घोषणा होणे बाकी असून आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vidhan Parishad Candidate) हेही वाचा : Vidhan Parishad Election : खासदार पार्थ पवार यांचा मास्टरस्ट्रोक? विक्रम काकडे यांचे नाव विधानपरिषदेवर जवळपास निश्चित Vidhan Parishad Election: भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार? पक्षश्रेष्ठींकडून आदेश अन् रवींद्र चव्हाण दिल्ली रवाना